STORYMIRROR

विनोद उमरतकर

Comedy Others

3  

विनोद उमरतकर

Comedy Others

नशा

नशा

1 min
272

साऱ्याशी समजदारीची, मी भाषा बोलतो।

आणि ती विचारे "मी कोणता नशा करतो"।।


चुकी करत नाही, पण चुकलं कधी काही।

तर वेळ पाहुनी शंभर, मी उठाबशा काढतो।


धड होतं नाही, माझे कोणतंच काम एकही।

प्रत्येक कामात मी, बिनकामे काक्षा काढतो।।


मेहनतीचा लोभ नाही, देणारा तो नक्की देई 

मी फक्त हातावरील, नशिबाची रेषा पाहतो।।


आपल्याच कर्मी, जेव्हा तेव्हा पडतो तोंडघशी।

आणि आपलीच वाईटाहून वाईट दशा करतो।।


कुणी हसत असेल तर त्यासी हस म्हणतो।

त्यांच्या आनंदासाठी स्वतःचाच हशा करतो।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy