STORYMIRROR

विनोद उमरतकर

Romance

3  

विनोद उमरतकर

Romance

सखे तू माझी

सखे तू माझी

1 min
217

सखे, तू माझी टेडी, अन मी तुझा टेडा।

पहिल्या प्रेमात राणी ,धिर धर ना थोडा।।धु।।


आले कित्येक सोहळे असे प्रेमाचे राणी।

तुझी माझी सखे,वेगळीच प्रेम कहाणी।

नाही जाणार कधी ,तुझ्या विश्वासाला तडा।।1।।


कुणा कुणा सांगू ,आपुल्या प्रेमाची महती।

जाती पातीच्या पुढे ,आपल्या प्रेमाची कीर्ती।

जिंकू अवघे जग,टाकून प्रेमाचा सडा।।2।।


तूच राणी माझी, जन्मा जन्माची सखे।

ये माझ्या जीवनी, दूर पळतील सारी दुःखे।

त्या दुःखांचा आता बघ, भरलाय घडा।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance