आई
आई
1 min
264
विसर तुझा हा ।
कधी होणे नाही।
देतो मीही ग्वाही।
तुला आई।।
शिकवलं जे तू।
आहे ते डोक्यात।
तू आहे हृदयात।
कायमच।।
कितीही असलो।
तुझ्या दूर आई।
मला तुझी राही।
काळजीच।।
तुझ्याच कोर्टात
सारे गुन्हे माफ।
करी तुझा जाप।
संकटात।।
विसरणं नाही।
तुझे उपकार।
आहेस आधार ।
माझी आई।।