STORYMIRROR

विनोद उमरतकर

Comedy

3  

विनोद उमरतकर

Comedy

प्रेमाची रेष

प्रेमाची रेष

1 min
339

जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस।

तरी अजून जुळली नाही, कुठे प्रेमाची रेष।


किती केलेत प्रयत्न, किती उपवास नी यज्ञ।

ओलांडुन गेली आता, माझ्या वयाचीही वेस।


भरली होती एकदा, सुंदरा एक ती मनात।

नेमके त्याचं वेळी कमी गेले डोईवरचे केस।


दोष देऊ कुणा कुणा, घडला काय गुन्हा।

आणखी किती रे देवा वाट पाहू मी शेष ।


ठरवलं शेवटचे, आता राहायचे एकटेच।

समजा कुणी बैल, की समजा मज मेष।


हात पाय जोडुनी, करितो मी विनवणी

जुळून द्या की राव, माझी कुठं प्रेम रेष।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy