शब्दावाचून कळले सारे
शब्दावाचून कळले सारे
1 min
372
शब्दावाचून कळले सारे।
अकल्पित हे घडले सारे।
वाटायचा जो भास सदा
प्रत्येक्षात ते उतरले सारे।
रात रंगललेली प्रेम स्वप्न
पहाट उजेडी मोडले सारे।
नात्यास त्या काय म्हणावे
क्षणांतच जे दुभंगले सारे।
लावले जे नशिबास ठिगळ
खोट्या भ्रमा उसवले सारे।
