STORYMIRROR

विनोद उमरतकर

Inspirational

4  

विनोद उमरतकर

Inspirational

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
306

किती किती रूपे तुझी

किती सारे तुझी नावे।

एकटीच तू स्त्री शक्ती

किती सारे करी कामे।


मज गर्भात वाढवुनी

सोसल्यास तू वेदना।

लेकरांसाठी आई तू

किती भोगल्या यातना।


बालपणी तू झाली ताई 

किती केल्या धिंगामस्ती।

असे पाठीवर हात तुझा

मज चिंता नसे कोणती ।


मैत्रिणी सारखी नव्याने

पुन्हा एकदा तू भेटली।

खऱ्या मैत्रीची मनात

बीजे अंकुर पेरली।


आयुष्याच्या वळणावरी

तू पत्नी बनूनी आली ।

साताजन्माची तू माझी

खरी सोबती झाली।


होतीस तू सोबतीला

जगण्या मिळाला अर्थ।

तुझ्यामुळे जीवन माझे

झाले पूर्णतः सार्थ ।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational