STORYMIRROR

Kanchan Moon

Comedy

3  

Kanchan Moon

Comedy

एक कप चहा

एक कप चहा

1 min
213

एक कप चहाच 

पडला मला भारी..

सुट्टे पैशासाठी घ्यावे

लागली मला ऊधारी....


काय सांगू चहाची 

गंमत ही मजेसाठी....

सारं सोसलं मी खरं

एक कप चहासाठी ...


घरात नव्हती चहापत्ती,

साखर ही संपली होती....

चहा पिण्यासाठी मात्र

मीच तळमळत होती...


 चहासाठी मैत्रीणीकडे

 बसले गप्पा मारीत....

नुकताच चहा झाला

बसली तीही बोलीत...


मीच काढला विषय 

चहाची शोधली कहाणी...

एक कप चहासाठी 

आली आठवणीत जवानी...


गप्पा रंगल्या खूपच

चहासाठी जीव हसला 

मैत्रीण झाली खूशच 

तेव्हा तिनं चहा ठेवला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy