पाऊस
पाऊस
1 min
217
पाऊस आला,
वाहतो वारा.
रस्ता ओला,
पडती गारा.......१
झाडे वेली,
स्वच्छ झाली.
फुले पाखरे
गाऊ लागली.....2
मनी उमटली,
चाहूल इवली.
क्षण आली,
पुरती भिजली....3
झरा हसत,
वाहू लागला.
नदीत धुंदीत,
मिसळून गेला.....४
पाऊस पहा,
छंदात नाचला.
धरतीलाही कसा
छेडू लागला.......५
