सामाजिक एकता हवीच
सामाजिक एकता हवीच
1 min
302
अज्ञानाची नको वाट,
ज्ञानाचा चढू या घाट.
माणसाला माणूसकीने,
ऐटीत मांडूनी घेऊ थाट.
जातीय वादही मोडू,
मानवतावादास जोडू.
विषमता इथली खोडू,
अहंकारास इथेच मोडू.
संविधानातील एकता,
समाजात हवीच आता.
सांगे महान धम्म दाता,
अवनीस सोडून जाता.
हातात मदतीचा हात,
माणुसकीची करू बात.
मानवतेच्या छत्रछायेत,
निराशेवर करू या मात.
