पाऊस मनातला
पाऊस मनातला
1 min
203
पाऊस मनातला खरा,
पडतो मी आनंदी जेव्हा....
चिंब भिजवितो धरा
बेधुंद बरसतो तो तेव्हा......१
काटेरी भयान वनात,
अचानक नेतो मज जेव्हा,
टोचतो तोच अंगास,
झरझर बरसत राहतो तेव्हा.....२
पाऊस नशीला रिमझिम,
सुरात नाचतो सरसर जेव्हा....
मन सुगंधात हरवते असे,
भिजते तुझ्याच मिठीत तेव्हा....3
सुगंधास अवनीच्या नसे,
काही मधुसुगंधीत होई जेव्हा
पावसाच्या धाराच करती,
तृप्त धरेस अखंडितपणे तेव्हा.....
