कविता : शब्दसंपत्ती
कविता : शब्दसंपत्ती

1 min

70
शब्दाला शब्द जोडता होते वाक्य,
शब्दाला शब्द ऐकता होते काव्य ।।
शब्दांच्या वाक्यात जोडतात बंध ,
शब्दांच्या काव्यात दरवळतात गंध।।
शब्दांच्या बंधात न्हाहतो रविराज,
शब्दांच्या सुगंधात हरवतो कवीराज।।
शब्दांनीच रवीराज जाणतो सृष्टी ,
शब्दांनीच कवीराज जाणतो दृष्टी।।
शब्दांच्या सृष्टीत बहरते साहित्य,
शब्दांच्या दृष्टीत बहरते दिव्यत्व ।।
शब्दांच्या साहित्यातच मन लुभावते,
शब्दांच्या दिव्यत्वाचाच मन प्रतिभावते ।।
शब्दांचे लुभावने सर्वांच्या प्रीतीत,
शब्दांचे प्रतिभावने सर्वांच्या महतीत।।
शब्दांची ही प्रीती जाणून घेवू ,
शब्दांची ही महती समजून घेवू।।
शब्द संपत्ती ही तशीच जपून ठेवू ,
शब्दांची संपत्ती ही अशी वाढवत जावू।।