STORYMIRROR

ravee Fulzele

Comedy

3  

ravee Fulzele

Comedy

वायफाय

वायफाय

1 min
509

हा वायफाय भलताच हायफाय... 

किती ही म्हंटलं तरी आपण करणार काय ?

आम्हा मुलांना तर तो वैताग आणतो.. 

पहिल्याच पिरियड ला रंग दाखवतो.. 

आला आला.. गेला गेला करत असाचं वेळ जातो.. 

ऑनलाईन क्लासेस चा तर तो बट्टयाबोळचं करतो.. 

मग टीचर करतात मुलांच्या तक्रारी.. 

यावर आईच उत्तर मॅम वायफाय नाही.. 

ऑनलाईन मीटिंग.. 

ऑनलाईन चॅटिंगची तर 

वाटच लागते.. 

तो थांबला की सर्वच थाबंते.. 

कोणाला काही पाठवायचे असले की याचा हट्टीपणा सुरू होतो.. 

गोल गोल फिरून नुसताच टाईमपास करतो..

काहीच करायचं नसलं की निमित्त मिळतं छान 

अगं काय करू वायफाय च नीट चालतं नाही आज.. 

गरज नसली की नीट चालतं.. 

गरज असली तर चालतंच नाही.. 

कितीही त्याला नावे ठेवली तरी.. 

या कोरोना च्या काळात त्याचीच मैत्री खरी.. 

तरीही म्हणावे लागेल 

हा वायफाय भलताच हायफाय.. 

त्यांच्याशिवाय पर्याय काय?


Rate this content
Log in

More marathi poem from ravee Fulzele

Similar marathi poem from Comedy