STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Comedy Drama

3  

अमोल धों सुर्यवंशी

Comedy Drama

तोंडाचं मुस्कं (मास्क)

तोंडाचं मुस्कं (मास्क)

1 min
267

शांता काकू वैतागल्या..

सूनचा नखरा बघून खूप तापल्या.

बाहेर चिन्याचा पावना आलाय.

जसा काय माझा दिवट्याचा,मेव्हणा आलाय.

सुनेकडे हात तोरे करून मुर्खा काय मारत्या 

रुबाब बघा टिटवीचा लाल, साडीवर लाल घेत्या,

हिऱ्याव्या साडीवर, हिरवा घेत्या.

रंगे, मुसक्याचा भाव लय वाढलाय,

कवडीच्या किंमतच त्याला सोन्याचा दर चढलाय.

अग पदर नसतो ना, डोईवर, त्यालाच घे तोंडावर.

बाई रंग बघून कोरोना किकूण जाईल 

ईश बया, तुमचं नखरे बघून दुसरा पार्ट आला.

 बंद करा, नाहीतर तिसरा पार्ट येईल..

 कचरा घेऊन जाणाऱ्याचा रुबाब वाढलाय.

सकाळी काम पण करतोय,

दुपारी मुसक नसणाऱ्यांनकडून पैसे पण कमवतोय.

इथे माझा कार्ट्याला नोकरी नाही,

हा कोरोनातला देव,तर नवीन घर बनतोय..

काल तो गण्या शिपाई थोटुकल घेऊन आला,

आणि म्हणतोय " हँडसप म्हातारे".तुझा ताप याच्यात दिसतोय.

सून फुसकारली गण्या काका, हीचं मोटा ताप आहे,

कोरोना हिच्या नरडीवर कसा काय नाही बसतोय.

 गण्या काका उदगारला म्हतारे तू कामून आज तापली.

म्हतारी लय भडकली,गतकळ्या,वरिस वाहिला आलं 

आजून कशी काय नाही,आली तुमची कोरोनाची बाटली.

आर नाय सापडत दवा, तर खोटा करू नका वादा.

हातात देताय आत्मनिर्भलतेची रिकामी किटली.

काका हीला आणून दया एकादी दारू बाटली.

 म्हातारी खटाकली.

अग फरिंगे शेतीत रबलेलेची रग मेहनती.

कोरोना काय त्याची आई आलीतरी.

तिला नाय चपातीसारखी लाटली.

तर..माझं नाव नाय शांती...


"काजी घ्या,घरच्याची,आणि स्वतःची ही...

आणि हो मास्क लावून फिरा,

नाहीतर व्हाल हॉस्पिटलात भरती"


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy