STORYMIRROR

Manisha Awekar

Comedy Others

3  

Manisha Awekar

Comedy Others

मजेशीर लॉकडाऊन

मजेशीर लॉकडाऊन

1 min
215

आले आले लॉकडाऊन

शिक्षा घरात बसायची

आमच्या घरी मात्र 

मजा वात्रट मुलांची 


चुलत मामेभाऊ होते

आधीच स्थानापन्न

लॉकडाऊनमुळे

हलायची नव्हती चिन्हं


रोज नव्या नाष्ट्याची

फर्माईश यायची

पुरवता पुरवता

आई बेजार व्हायची


पत्ते कँरमचा दंगा

विचारुच नका

ओरडाआरडा करुन

मारला ह्यांनी डंका


कामात मदत करताना

दूधात ताक मिसळले

आईला समजावताना

माझ्या नाकी नव आले


बिचारी आई करुन करुन

चक्कर येऊन पडली

मग मात्र वानरसेना

माझ्या मदतीला धावली


ओटाभर पसारा करुन

कसाबसा स्वयंपाक केला

पोरांनी जेवणानंतर मात्र 

आरामात सिनेमा लावलेला


ढकलगाडी कशीतरी

मायलेकींनी रेटली

जाताना भाऊरायांनी

दणक्या भाऊबीज घातली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy