ऑड!
ऑड!


ए बाप्पाs! अशा कशा रे
जमती या जोड्या?
वाटतात ना ऑड त्या
थोड्या थोड्या!
कोणी भरभक्कम कोणी रड्या!
नवरा लंबू तर बायको टिंगू
काळसर नवरा बाई पिट्ट गोरी!
बायको काळी तर नवरा गोरा
ती खूप शिकलेली
हा डिप्लोमा!
एक गडगंज दुसरा गरीब
शांत माणसाची बायको भडकू!
संपते नव्याची नवलाई मग...
मग संसार लागतोय तडकू!
काही तरुन जाती भवसागर
काही मध्येच बुडती या होड्या!
ए बाप्पाs! अशा कशा रे
जमती या जोड्या?
वाटतात ना ऑड त्या
थोड्या थोड्या!
कोणी भरभक्कम कोणी रड्या!
करतो तुला विनंती
जे करती मनोभावे भक्ती
ठेव अखंड प्रीती एकमेकावरती
अन् ठेव तुझ्याच हाती त्यांच्या
आयुष्याच्या नाड्या!