STORYMIRROR

Manisha Awekar

Comedy

3  

Manisha Awekar

Comedy

खड्डेच खड्डे चहूकडे

खड्डेच खड्डे चहूकडे

1 min
337

मूळ कविता रिमझिम पाऊस पडे सारखा

यमुनेलाही पूर चढे


मूळ कवितेचे कविवर्य पी सावळाराम यांची क्षमा मागून विडंबन कविता पाठवत आहे 


अफाट पाऊस पडे सारखा 

धरणांनाही पूर चढे

खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई 

गेला रस्ता कुणीकडे

अफाट पाऊस पडे सारखा (1)


खड्डे कसले हे गतिरोधक

त्यात साठले मुठेचे जल 

वाहता जल ते ओसंडूनही

तारांबळ ती आमची उडे गं बाई

गेला रस्ता कुणीकडे

अफाट पाऊस पडे सारखा  (2)


खड्डे चुकवा, रस्ता शोधा

त्यात अॉफिसची वेळही गाठा

इकडे तिकडे तोल बिघडता

मिळेल बक्षिस प्लॅस्टरचे गं बाई 

गेला रस्ता कुणीकडे

अफाट पाऊस पडे सारखा  (3)


दुचाकीच्या त्या लख्ख दर्पणी

मोटारची ती मुक्त फवारणी 

रडकी त्याची स्वारी बघुनी

खड्ड्यांनाही उर फुटे गं बाई

गेला रस्ता कुणीकडे

अफाट पाऊस पडे सारखा (4)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy