विडंबन काव्य
विडंबन काव्य


मूळ गीत - ये भोळ्या शंकरा
ये रुळावर तू ये ऐ ऐ ऐ sss (२)
आवड तुला धावण्याची आवड तुला धावण्याची
सुसाट धावण्याचीssss
ये रुळावर
गाड्या सर्व बंद कशा झाल्या
कोरोनाने कहर केल्या केल्या
आवड तुला धावण्याची आवड तुला धावण्याची
ये रुळावर तू ये...
ड्रायव्हर सावरे तुझी गती
गार्डच्या शोभे झेंडा हाती
आवड तुला धावण्याची आवड तुला धावण्याची
ये रुळावर तू ये..
गर्दी आता नाही प्लॅटफॉर्मवरी
करेनाच
कोणी कुठे वारी
आवड तुला धावण्याची आवड तुला धावण्याची
ये रुळावर तू ये...
तिकिटासाठी रांग लागते भार
तुला पकडण्याची लगबग सारी
आवड तुला धावण्याची आवड तुला धावण्याची
ये रुळावर तू ये...
येण्याआधी सुर्यकिरणे धरणीवरी
निघतसे दिमाखात तुझी स्वारी
आवड तुला धावण्याची आवड तुला धावण्याची
ये रुळावर तू ये...
आता तरी ये गं तू लवकरी
आस तुझी बेजार करीतसे भारी
आवड तुला धावण्याची आवड तुला धावण्याची
ये रुळावर तू ये...