विडंबन काव्य
विडंबन काव्य

1 min

82
आला गं बाई आला गं बाई आला
आला आला आला आला
जोरात पाऊस आला
की नीट बघ जोरात पाऊस आला||
मातीचा दरवळ सुटलाया भारी
ओलेत्या अंगाची अदाच न्यारी
सर्दी होईल जरा आवरा अरेरेरे
ताप येईल जरा आवरा ओ हो sss
जोरात पाऊस आला||
द्वाडानं घातलंया ह्या रिंगणा
त्यात ह्या कोरोनाचा धिंगाणा
रातदीन घरात बसवलंया
बाहेर मास्क लावुन फिरतोया
उघडता तोंड घालतोया घाला.. बाई बाई
जोरात पाऊस आला||
आता ह्यो आवरणार कसा
नदीला पुर येतोया भसाभसा
दारात पाणी अन् घरात पाणी
काळीज चीर्र करतोया हा हा
काळीज चीर्र करतोया
जोरात पाऊस आला||