विदूषक
विदूषक
1 min
100
सर्कशीत विदूषक असे मानाच्या त्या स्थानी
विरंगुळा प्रेक्षकांचा करण्याचे त्याच्या मनी
खोड्या करीतसे नाना चाळे विनोदी त्याचे
देहबोली अचंबित स्पष्ट संकेत मनाचे
हासवणे कला त्याची दुःख स्वतःचे लपवी
हीच कला आहे खरी सळसळ ती ओघवी
म्हणूनची ठरलासे अग्रगण्य सर्कशीत
हत्ती घोडे प्राणी सारे ह्याच्यापुढे झुलतात
