प्रेम असावे कसे
प्रेम असावे कसे
1 min
230
प्रेम असावे राधाकृष्णासम सदैव अजरामर असणारे
प्रेम असावे मधुर बासरीसम कर्णांना हवेहवेसे वाटणारे
प्रेम असावे रातराणीसम अखंड दरवळत राहणारे
प्रेम असावे पैंजण पाऊलासम मनमुराद झंकार पसरवणारे
प्रेम असावे माळलेल्या गजऱ्यासम वातावरण सुगंधीत करणारे
प्रेम असावे धरणी आकाशासम मोहकतेने क्षितिजावर टेकणारे
प्रेम असावे इंद्रधनू आणि वर्षेसम आभाळी रंग भरणारे
प्रेम असावे ओवी अन जात्यासम पहाट प्रहरी आळवणारे
प्रेम असावे पौर्णिमा अन चंद्रासम आसमंत उजळून टाकणारे
प्रेम असावे प्रेमळ शब्दासम सर्वांची मने जिंकणारे
