सागरगोटे
सागरगोटे
1 min
862
जमल्या सख्या मैत्रिणींचा ग दंगा
खेळ खेळण्यासाठी केला आज बाई पंगा
खेळ नानाविध किती खेळावे खेळावे
सागरगोटे आज संगे कोणी गं आणावे
बसल्या गोल करुनी रंगला खेळ सारा
एक छप्पी दोन छप्पी थापा हातानी गं मारा
लक्षवर खाली होते सात किंवा नऊ घ्यावे
नजरेच्या ह्या खेळात सारे सामावुनी यावे
