चिमणी उडाली भुर्रकन
चिमणी उडाली भुर्रकन
1 min
448
लहानपणी माझ्या होतेना एकची गाणे
गोजिरवाणे चिव चिवते चिमणी
कशी गाते गोड मधुर हो गाणे
बाळाला भात भरविताना चिऊ काऊ संगे रंगे मस्ती
खेळता खेळता रंगल्याने गटवण्याची नसते धास्ती
अशीच गं अचानक कशी रोजची घरामध्ये ती येते
मला जवळी पाहुनी बघा चिमणी भुर्रकन उडते
इटुकली पिटुकली छबी पंख उडवी फडफड ते
पावसाची त्या चाहुल येता साठलेल्या पाण्यात डुंबते
गोड गोजिरी चिमणाबाई आज दिसेचना फार
कुठे झाली गं गुडुप चिऊताई सांग मला आई सांग कुठे
