*अलंकार*
*अलंकार*
1 min
267
बिंदी शोभे भांगात
प्रीत भावना नजरेत
बुगडी वेल कानांत
डुल डोलती डौलात
नथीचा अकडा नाकात
गळेसर तो गळ्यात
बाजूबंद दिमाख दंडात
गोठ पाटल्या हातात
अंगठी नाजूक बोटात
कंबरपट्टा डौलदार कंबरेत
छुमछुम पैंजण पायात
जोडवी अडखळती पाऊलात
नटते ललना सौंदर्यात
शोभिवंत त्या शृंगारात
अलंकार हे विधिवत
घालुनी चाले झोकात