मोर पिसारा
मोर पिसारा

1 min

520
थुईथुई नाचणारा
चाळ बाई पायात
मोर आला दारात
पिसारा ग फुलवित
रंग त्याचा खट्याळ
गर्द मिरपिशी छान
बघुन ग त्याचा डौल
भुलुन जाई हे मन
चोच इवली इवलीशी
वर शोभे तुरा सुंदर
डोळे इवले इवले
मान डुलवी चौफेर
पिसाऱ्याचा डौल
न्यारा न्यारा कसा
त्याची नवलाई किती
जगातील आश्चर्य जसा
फुलव फुलव रोज
पर्जन्य असे वा नसे
पाहण्या तुझा दिमाख
जीव माझा कासावीस