STORYMIRROR

Uddhav Bhaiwal

Comedy

3  

Uddhav Bhaiwal

Comedy

काही कळेना मला

काही कळेना मला

1 min
324

काही कळेना मला, माझी स्मरणशक्ती कुठे गेली

विचार करून करून, मेंदूची या चाळणी झाली


चष्मा असतो डोळ्यांना, अन् शोधतो मी घरभर

सुटीच्या दिवशीही ऑफिसला जातो मी भरभर


अशी कशी भगवंताने दैना बघा माझी केली

विचार करून करून, मेंदूची या चाळणी झाली


मोबाईल माझा कितीदा हरवतो अन् सापडतो

पेन असतो खिशाला अन् ड्रॉवरमध्ये मी शोधतो


बाजारात भेटली माझी सौ., पण ओळखू नाही आली

विचार करून करून, मेंदूची या चाळणी झाली


कोणत्या जन्मीचे हे पाप? कोणत्या जन्मीचा हा गुन्हा?

उत्तर दे परमेश्वरा, विचारतो मी पुन्हा पुन्हा


स्मरणशक्तीची अन् माझी ताटातूट का रे केली?

विचार करून करून, मेंदूची या चाळणी झाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy