कोण म्हणतं मुलगी सासरला जाते
कोण म्हणतं मुलगी सासरला जाते


कोण म्हणतं आता
सासरी जाते मुलगी
लग्नाआधीच तिची असते
सासरच्यांशी सलगी
जीन्स पॅन्ट आखूड टॉप
सॅंडल वाजवते टॉक टॉक
सासूबाईंना हात मिळवते
मामंजी ना हाय म्हणते
दिराच्या पाठीत गुद्दा घालते
कोण म्हणतं मुलगी सासरला जाते
माहेरपेक्षा सासरी बरेच होतात लाड
गरोदरपणात सासू-नवरा जपतात जीवापाड
आपल्या तालावर सर्वांना नाचवते
कोण म्हणतं मुलगी सासरला जाते
सासरचं घर तिचं हक्काचं असतं
सासरी तिला कोणी टोकणाऱं नसतं
नोकरी करते जिमला जाते
विकेंडला पिकनिक पार्ट्या करते
आपलं छकुलं बिनधास्त सासूच्या गळ्यात मारून जाते
कोण म्हणतं मुलगी आता सासरला जाते
तिच्या आई-बापांची काळजीदेखील
लेक-जावई दोघं मिळून घेतात
अडीअडचणीला आजारपणाला
पैसा पण देतात
सासर-माहेर असं आता वेगळे काही नसते
कोण म्हणतं मुलगी सासरला जाते
या गल्लीत सासर असलं
तर दुसर्या गल्लीत आई-बाप असतात
उठ सूट लेकीच्या संसारात
आपलं नाक खुपसत असतात
मुलगी पण संसार आईच्या सल्ल्याने करते
कोण म्हणतो मुलगी आता सासरी जाते
पोरीला असते माहेरची ओढ
सासू-सासर्यांना असतात
दुभत्या म्हशीच्या लाथा गोड
पोराच्या संसारासाठी
निमूटपणे बघायचे असते
कोण म्हणते मुलगी आता सासरी जाते
आपुल्या त्या सोन्यासाठी चिंधी करावी जतन
आपल्या त्या लेकासाठी सून म्हणावी रतन