झाला का? कोरोना...
झाला का? कोरोना...
नाना तापला आहे
त्याला खोखला आहे
नाना तालुक्याला जातो
गावात लहान मुलांना गोळा करून बसतो
गाववाल्यानी पोलिसांना कळवले
पोलीस गावात आले
एम्बॉल्सच्या आवाजने
गाववाले टरकले
गोम्या काका मोठमोठयाने रडत होता
सून त्यांची समजूत काढत होती
विचारले काय झालं मामा
गोम्या काका हळू आवाजात हुकारला
काल मी आणि नाना रुक्मीच्या
घरात गेलो होतो प्याला
सून बाय ओरडली म्हताऱ्याला
काय बाय अवकळा सुचली
धक्का देऊन सासऱ्याला बाई
सरपंचाच्या घरी पोचली
लोकांना पाहून गडबडली
कोणी म्हणे नाना काल शेतात भेटला
कोणी म्हणे काल नाना कडून तंबाखू घेतला
काही तर रडत रडत बोलत होते
रुक्मिणी तर डोक्यावर हात मारत ओरडत होती
गोम्याची सून तिच्याकडे रागाने बघत होती
धाडशी सरपंच घरात लपला
पोलिसांच्या सांगाव्या मुळे बाहेर पडला
लोकांकडे बघून गप्प रहा सारे
पोलीसाला कळलं सारे जाऊ हॉ
स्पिटला
सरपंच लोकांकडे बघून
नाना काल माझा सोबत पाते खेळत होता..
हे बोलून सरपंच नानाच्या घरी धावला..
नाना बाहेर येत नाही पोलीस उलघाडला
नाना भिऊ नका आम्ही तूमच्या सोबत आहे
नाना बंदुक घेऊन बाहेर आला
भांड्यानो त्या चिन्याचा रोग
कसा काय मला झाला?
परवा शेतात भिजलो
म्हणून तर तापलो
मला नाय झाला कोरोला
सरपंच नाना कोरोना
गप्प फाट्या गुमान हितून जायचं
तुच्याबर मला नाही यायचं
सरपंचाने पोलिसाचे पाय धरले
नानाला आम्ही घरात डाबून ठेवू
वाढला जर ताप तर निरोप धाडू
आता तर गावात कोरोना होता
आता प्रत्येकाच्या घरात शिरला....
गावात पावना जोरात गाजत होता
झोपत कोरोना जागे पणी कोरोना
खऱ्या अर्थात या गाव वाल्यानी
पंधरा दिवसाचा लॉक डाउन पाळला....
एका महिन्याने नाना सरपंचाला बोला
मग काय झाला का?
कोरोना बरा...