STORYMIRROR

Pradnya Khadakban

Comedy Inspirational Children

3  

Pradnya Khadakban

Comedy Inspirational Children

उन्हाळा

उन्हाळा

1 min
491

आनंदाचे तरंग उन्हाळा

सुखाची सर उन्हाळा

आजोळची ओढ उन्हाळा

जीवनाचा अविभाज्य अंग उन्हाळा


मैत्रीचा गंध पसरवितो उन्हाळा

चांदण्याची शीतल छाया उन्हाळा 

रखरखत्या उन्हात आंबटगोड कैरीचं पन्हं

गुलमोहराच्या फुलांच्या सड्यात होतो नाचायचा मोह 


पण आता केलाय कोरोनाने कहर

बिघडवलाय सभोवतालचा माहोल

आला चिनच्या वुहानचा हा पाहुणा

चीनला परत जायच नावच घेईना


सुट्टी आपुलकीची आणि जिव्हाळ्याची

पण त्यावर सुद्धा सावट त्या लॉकडाऊनची

सुट्टी असूनसुद्धा नाही करता येत धमाल

हिच त्या दुष्ट विषाणूची आहे कमाल


पटांगणातले खेळ सुद्धा झाले बंद

पारावरच्या गप्पाचं शमलंय द्वंद्व युद्ध

नाही कुठे हिंडण आणि फिरणं

अवघड झालंय आता चार भिंतीतलं जगणं


लग्न नाही, बर्थडे पार्टी नाही

कोणत्याच समारंभाच आमंत्रण नाही

नुसतं घरात बसा

आणि फुटकळ हसा


जीवन झालंय भकास व त्रस्त

सगळेजण मोबाईल मध्ये व्यस्त 

घरात बसून बसून आलाय आता कंटाळा

सरकार या कोरोनाला कुठेतरी पळवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy