STORYMIRROR

Pradnya Khadakban

Tragedy Children

3  

Pradnya Khadakban

Tragedy Children

हरवली पाखरं...हरवलं मन...

हरवली पाखरं...हरवलं मन...

1 min
224

ओढ बाळाच्या आगमनाची,

ओढ बाळाच्या किलबिलाटाची,

नऊ महिन्याची प्रतीक्षा मायेची,

रडलं बाळ पहिल्यांदा तेव्हा,

आनंदाने न्हाली तिची काया,

बाळाची हसरी काया पाहण्यास,

तिचा जीव आसुसला,

बाळाची हसरी काया,

आईची हसरी छाया,

पण क्षणात विरजण पडलं आईच्या आनंदावर, 

आईपासून बाळाला कायमच तोडलं,

बाळ आईपासुन दुरावल,

परत कधी न येण्यासाठी...

पाखरू घरट्यात यायच्या अगोदरच,

उंच आकाशी उडून गेलं,

परत कधी न येण्यासाठी...

हरवली पाखरं...हरवलं मन...

उरला फक्त...

आईचा आक्रोश...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy