शब्द
शब्द
शब्द शब्दांची रसाळता
वाढते नात्याची मधुरता
शब्द शब्दांची कटुता
वाढते नात्यांची कठोरता
शब्द शब्दांचा हा खेळ
मनामनाचा हा मेळ
शब्दांचे नाते मनाशी
मनाचे नाते हृदयाशी
शब्द नसावे कठोर
शब्द व्हावे अनमोल
शब्द शब्दांचे प्रभुत्व
जीवनात शब्दांचे महत्व
प्रेमळ शब्द मने जोडती
कटू शब्द ह्रदये तोडती
मन जोडावे की तोडावे
माणसाच्याच हाती
