आई
आई
आईचा महिमा अपार
देते मुलांना आकार
करते जीवन साकार
बनते मुलांचा आधार
आईचे प्रेम म्हणजे दुधावरची साय
आईचे प्रेम म्हणजे मायेचा ओलावा
वाहते अथांग प्रेमाचा सागर
आपल्या असंख्य चुका...
पोटात घालणारा महासागर
आई म्हणजे लेकराची माय
आई म्हणजे जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही
म्हणूनच म्हणतात,
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"
