तुझं आणि माझं
तुझं आणि माझं
कशाला हवाय तुझ्यात आणि माझ्यात अहंकार...
अहंकारच आणतो मग आयुष्यात अंधःकार...
नातं जोडावं प्रेमाचं, नातं घनिष्ठ करावं विश्वासानं...
माझं तुझं करत राहिलो तर आयुष्य असंच निघून जाईल...
सरते शेवटी वाटेल आयुष्य जगायचंच राहून गेलं...
नको कोणताच आपल्यात किंतु-परंतु...
दोघे मिळून आयुष्य हसतखेळत जगू...