STORYMIRROR

Pradnya Khadakban

Inspirational

3  

Pradnya Khadakban

Inspirational

माझी आर्मी माझा देव

माझी आर्मी माझा देव

1 min
249

सलाम माझ्या भारतीय आर्मीला....

सीमेवर पण पोलादासारखा उभा तो, 

आपतकालीन परिस्थितीत पण, 

निर्भयपणे उभा पण तोच, 

प्रत्येकाच्या मनातील आदरस्थान तोच, 

संकटसमयी उभा राहणारा देव तोच,

संकटातून तुम्हांला बाहेर काढेलच, 

असा विश्वास देणारा देवही तोच, 

सलाम माझ्या त्या देवाला, 

सलाम माझ्या भारतीय आर्मीला....


कधी बंदूक हातात घेऊन रक्षण करणारा तो देव, 

कधी बोट घेऊन येऊन रक्षण करणारा तो देव, 

कधी हेलिकॉप्टर मधुन येणारा हा देव, 

नानाविविध माझ्या या देवाची ही रूपे, 

सलाम माझ्या त्या देवाला, 

सलाम माझ्या भारतीय आर्मीला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational