माझ्या खिडकीतला पाऊस
माझ्या खिडकीतला पाऊस
खुणावतोय वारा,
खुणावतोय पाऊस...
वाट माझी पहातोय,
माझ्या खिडकीतला पाऊस...
पाऊस म्हणाला मला,
तु खिडकीत बस...
मी म्हंटलं, मी का बसु खिडकीत ?
पाऊस म्हणाला मला,
तु माझी आठवण काढते...
माझ्या आठवणीत,
कोपऱ्यात कुढत बसते...
मी म्हटलं, मी का तुझी आठवण काढू?
पाऊस म्हणाला मला,
तुझे नेहमीचे हे बहाणे,
माझ्यासाठी तुझे झुरणे...
या खिडीकीतच उभी राहुन,
तु मला सतत पहाते...
माझा प्रत्येक थेंब,
तु तुझ्या ओंजळीत झेलते...
तुझ्या हाताचा स्पर्श,
माझा प्रत्येक थेंब जाणताे...
तुझ्या प्रेमाची हाक,
मी नेहमीच ऐकताे...
मी म्हंटलं, पुरे झाला आता,
हा शब्दांचा खेळ...
माझं प्रेम व्यक्त करायला,
मी नाही लावत आता वेळ...
बेभान मी तुझ्या प्रेमात,
तुझ्या इंद्रधनुषी रंगात...
तुझ्या प्रेमाच्या स्पर्शात,
मला चिंब भिजावसं वाटतं ...
तुझ्या सरीतला प्रत्येक थेंब,
मला साठवुन ठेवावासा वाटतो...
तुझ्या स्वप्नांच्या जगात,
मला रोज जावसं वाटतं...
हिरव्यागार गालीच्यावर,
बेधुंद हाेऊन नाचावंसं वाटतं...
तुझं आणि माझं नातं,
असच राहवं अतुट...
जसं जन्मोजन्मांतरीच,
जुळलय आपलं सूत...
खुणावतोय वारा,
खुणावतोय पाऊस...
वाट माझी पहातोय,
माझ्या खिडकीतला पाऊस...
