STORYMIRROR

Manisha Patwardhan

Fantasy

3  

Manisha Patwardhan

Fantasy

जीवन

जीवन

1 min
196

मनासारखे जीवन 

मी जगते आहे

मनात येईल ते ते

 मी करते आहे ....


उंच गगनात झेप

मी घेते आहे

पतंगाशी चढाओढ

मी करते आहे ....


पवनासंगे आसमंती

मी झुलते आहे

वृक्षासवे रानामध्ये

मी डुलते आहे


फुलपाखरा संगे

मी फिरते आहे

भिरभिर भिंगरी खेळ

मी खेळते आहे...


फुलाप्रमाणे रोज

मी फुलते आहे

कवितेतला आनंद 

मी घेते आहे ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy