तुझी पल्याडची वाट
तुझी पल्याडची वाट
माझा अवघड घाट
तुझी पल्याडची वाट
मन वेडे आसुसले
त्याचा ओसंडला पाट.
माझा पसारा अफाट
तुझा न्याराच गं थाट
मी गुंताच गं अवघड
तू साधी निसरगाठ.
माझा अभ्यासच कच्चा
तुझं सारंच गं तोंडपाठ
मी सागर अति खारट
तू साखरपाण्याचा माठ.
वळणंच नागमोडी सारी
तरी सोडणार नाही पाठ
दिठीआड होतच नाही गं
तुझी पल्याडची ही वाट

