स्वप्नात रंगले मी...
स्वप्नात रंगले मी...
स्वप्नात मी रंगले
तुझ्यासवे जगण्यात
मी रे गुंतले
नखशिखांत तुझ्या
प्रीतीत मी बुडाले
स्वप्नात मी रंगले
झाले असे काहीबाही
आता ना उरले
तुझ्याविन काही
स्वप्नात मी रंगले
प्रेमात न्हाऊन निघाले
सख्या काय हे घडले
स्वतःलाच आरशात
पाहुनी लाजले
मोरपीसी स्वप्नात मी रंगले
ममत्वाने पाझरून गेले
पुन्हा एकदा मी लहान झाले
आपल्या जीवास वाढवू लागले
तुझे-माझे असे आता
काही ना उरले
तू अन मी एकरूप झाले
सख्या तुझ्यासवे सुखी
संसाराच्या स्वप्नात मी रंगले
उद्याचे रे कोणी पाहिले
आत्ताचे क्षण रे आपुले
नको आता अंतर कुठले
सख्या तुझ्या कवेत मी विसावले
गुलाबी स्वप्नात मी रंगले

