मैत्रीचा हा धागा
मैत्रीचा हा धागा
मैत्रीचा हा धागा
देतो आठवण
भावणिक बंध
होतो साठवण
क्षणास हसतो
क्षणिक राग तो
सुमने निष्पाप
ओंजळी भरतो
मैत्री तुझी माझी
स्मरते अजुनी
बोलके भाव ते
कोरते या मनी
विखुरता भय
सावरते मैत्री
दु:खाच्या संगती
सुखाची खात्री
मैत्रीचा हा धागा
बांधी तुला मला
जगा काय तोलू
मैत्रीच्या नात्याला
दुरावा ही येतो
मैत्रीत या सखे
क्षण आठवता
सुख गाली हासे
तू तिथे मी इथे
मध्ये भाव नदी
दुराव्यात वाची
आठवांची यादी

