STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

वाट पाहू कसा मी..

वाट पाहू कसा मी..

1 min
301

श्रावणा एकट्याने, सांग राहू कसा मी 

सांग आता मला तू, वाट पाहू कसा मी


प्रीत आहे युगांची, काय देऊ पुरावे 

जवळ येण्या हवे का, हे हजारो दुरावे 

या मुक्या वेदनांना, सांग साहू कसा मी 

सांग आता मला तू, वाट पाहू कसा मी


मी दिलासे कितीदा, हाय देऊ मनाला 

ये जवळ ये जरा तू, दूर लोटू जगाला 

दुःख या जीवनाचे, सांग वाहू कसा मी 

सांग आता मला तू, वाट पाहू कसा मी 


पाहताना तुला मज, भास होती सुखाचे

लोचनी पाहतो मी, स्वप्न वेडे प्रियेचे 

एकट्याने प्रिये हे, गीत गाऊ कसा मी 

सांग आता मला तू, वाट पाहू कसा मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance