STORYMIRROR

Arun Gode

Romance

3  

Arun Gode

Romance

सहेली

सहेली

1 min
233

प्रत्येक मनात एक पहेली असते,

ती पहेली नेमकी सहेली असते.

जीवनात एका सहेलीची गरज भासते,

कठीन वेळी ती असावी सोबत असे मन सांगते.

असावा सहभाग तीचा कठीण निर्णयात मध्ये,

पण कठीन वेळ्त ती आता माझ्या सोबत नसते.

बिना सहेलीचे जीवन अधुरे असते,

जर ती आज माझ्यासोबत असते.

जीवनाचे ओझे हलके झाले असते,

पण ती आता माझ्या जीवनात नसते.

तरी ती माझ्या मनाच्या सान्निध्यात वावरते,

म्हनुच ती माझ्या मनात कायम बसते.

किती भाग्यशाली तो पुरुष असतो,

ज्याची अर्धांगिनी खरंच सहेली असते.

शारिरीक प्रेमाची ओढ ती स्वाभाविक असते,

पण तीच्या सहकार्यची नेहमीच हाव असते.

जीवनात तीची उणीव नेहमीच भासते,

म्हनुनच ती अंतकरणात खोलवर बसते.

प्रत्येक मनात एक पहेली नक्कीच असते,

पत्नी बनावी सहेली असी आशा असते.

तारुण्यात ती जेव्हा सोबत असते,

तीचे महत्व तेव्हा नगण्य असते.

भावना मोकळ्या करण्याची संधी असते,

पण काळाचे गांभीर्य तेव्हा दोघांनाही नसते.

वेळ कोणासाठी थांबत नसते,

हे कटू सत्य दोघनाही माहित असते.

पण त्याचे गांभीर्य तेव्हा कळते,

जेव्हा ती आपल्या जीवनात नसते.

अर्धांगिनीपण खरी सहेली बनु शकते,

तीला ती संधी हमखास दिली पाहिजे.

आपले मन तसे मोकळे केले पाहिजे,

वेळेची ती गरज आहे हे समजले पाहिजे.

जे हातून निसटले ते विसरले पाहिजे,

जवळच्या वस्तूचे सोनं करता आले पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance