छंद
छंद
माझ्यात मी ना उरलो सखे
झालो पुरता दिवाणा तुझा
ओळख भावनांना सखे
श्वास आहेस तू माझा
तुला नजरेत साठवण्याची
धडपड करतो मी सदा
भाळावून टाकते नेहमी
तुझी कातील अदा
तुझा छंद जडला मनी
आता नसे सुटका कसली
स्वप्नातल्या देवघरात माझ्या
तुझी छबी घट्ट वसली

