मनातील भावना
मनातील भावना
सांग मला तू भाव मनातील
शब्द हृदयातील सांग मला
मी सांगतो माझ्या अंतरातील
शब्द किमयेचे आता तुला
मीच ओळखले भाव मनातील
वेचले मी कुसुमापरी
तूच आता गुंफ तेच शब्दातील
बरसात ही मनपटलावरी
भावना माझ्या मनाच्या सांगतो
तुला आज हृदयातुनी
कर स्वीकार तू पुकारतो
मी सप्त सुरातुनी

