STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

डोळ्यात तू

डोळ्यात तू

1 min
342

डोळ्यात तू, स्वप्नात तू, चांदणे तू शिंपिले

उधळले मोती पथो, उघडीले न शिंपले..

प्रीतीचे दोघे प्रवासी वाट चंदेरी प्रिया

मूक माझ्या भाव नाही लागल्या बोलावं या

चांदण्यांच्या या पथा वर ठेविता मी पाऊले....१ 


वाहिली प्रीती तिला मी रे तुझी मी सावली

अंतरीच्या वेदनेला साद जेव्हा घातली

अंधारल्या होत्या दिशा, दैव होते कोपले....२


हातात देता हात तू आकाश झाले ठेगणे

लाभले मज जे हवे ते काय मागू मागणे?

नकळत रे माझे मला एकटेपण संपले....३

 

प्रीतीचे हितगुज ते सांगते तुज साजना

देहात दाटे हा ऋतू, आल्या फुळूनी भावना

मृद्गंध माझ्या अंतरी, पावसाविन दरवळे.....४


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance