गुंतता हृदय हे
गुंतता हृदय हे
डोळ्यांत तुझ्या पाहुनी
क्षणभर हरवूनी गेले मी
समजलेच नाही मजला
एवढी तुझ्यात कशी गुंतले मी
केलीस काय अशी जादू की
कळलेच नाही कधी तुझी झाले मी
सोबत तुझ्या असताना
स्वतःलाही विसरुनी गेले मी

