STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Fantasy

3  

Priti Dabade

Tragedy Fantasy

कबुली

कबुली

1 min
279

कॉलेजात असतांना

चोरून प्रेम केले

आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध

मात्र मी गेले


फडाफडा बोलून

लोकांसी मी तोडले

परक्यांसाठी आप्तांना

मी सोडले


सासूला नाही सांभाळले

सेवा नाही केली

गुन्हा झाला मोठा

मेव्याची अपेक्षा तेवढी ठेवली


असून मी गृहिणी

नोकरी करते सांगितले

चुकीचं वागते मी

हे काही मान्य नाही केले


कबूल करते अंतिम क्षणी

मी चुका माझ्या

भीक मागते देवा

दयेची तुझ्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy