डोह
डोह
तुझ्या नयनाच्या डोहात,
वाटते डुबून रहावे.
त्या तळात खोलवर,
मिलनांच्या गंधात फुलावे.
प्रेमाच्या डोहाच्या मोहात,
कायमचे गुंतून रहावे.
उरी भावनांचा खोलात,
मोह विसरून उरावे.
अंधाराकडून प्रकाशाकडे,
उजळून निघावे.
एकमेकांच्या डोहात,
मतभेद मिटवून हसावे.
एकमेकांची करत काळजी,
काळजात मन गुंतवावे.
सुखाचा घास भरवत,
जीवनात नव चैतन्य जागवावे.
स्वप्नवेलीच्या हिंदोळ्यावर,
पुन्हा पुन्हा हळूवार झुलावे.
नव्या साहसाने पुरून उरावे.
जगावे पण, किर्तीरूपे उरावे.
