आज
आज
आज काळोखात रात्र का.... तुला शोधावयास निघाली....
शोधण्या जी फुले घेतली....तुझ्या गजऱ्यात निघाली....
कंपने सुतार खोपट्यासम जी... भ्रमंत देहांत होती.....
शोधली ती तार आता...विनून घरट्यात निघाली....
आज काळोखात रात्र का.... तुला शोधवयास निघाली....
शोधण्या जी फुले घेतली....तुझ्या गजऱ्यात निघाली....
सुसाट, बेभान, भयावह जी ...भासत वाट होती....
आकाळण्या तीज कासरी...गुंफून डोरल्यात निघाली.....
आज काळोखात रात्र का.... तुला शोधवयास निघाली....
शोधण्या जी फुले घेतली....तुझ्या गजऱ्यात निघाली....
घायाळ वाटे मजला....जे चालताना घाव बाणी....
परतताना वाटेवरीच ती.... फास बोथाट मिळाली....
आज काळोखात रात्र का.... तुला शोधवयास निघाली....
शोधण्या जी फुले घेतली....तुझ्या गजऱ्यात निघाली....
चमकदार दुधाळी वीज जी..दुभंगत आभाळ होती....
शोधाया त्यात लुप्त तारका..फौज काजव्यांत निघाली....
आज काळोखात रात्र का.... तुला शोधवयास निघाली....
शोधण्या जी फुले घेतली....तुझ्या गजऱ्यात निघाली....
आज मजलाच का नको .... उगी लवलेश प्रेमाचा..
शोधली कातरण्या नस जी...तुझ्या हृदयात निघाली....
आज काळोखात रात्र का.... तुला शोधावयास निघाली....
शोधण्या जी फुले घेतली....तुझ्या गजऱ्यात निघाली...