आजोबा हे तुमच्यासाठी!
आजोबा हे तुमच्यासाठी!
माणसातून तुम्ही उठलात तरी,
मनाच्या कोपऱ्यात नेहमी तुमची जागा राहील.
नातवंडांना आजपर्यंत दिलेलीं एक एक
शिकवण आखेर पर्यंत आम्हाला साथ देईल.
प्रेमाचे ते गोड शब्द ऐकायला
कान किती तरसतील आता,
इथून पुढचा प्रत्येक क्षण घेऊन येईल
आपल्या गोड आठवणींचा साठा.
कधीच कोणत्या गोष्टी ची मर्यादा
नव्हती तुमच्या निखळ प्रेमाला,
पण रोज तुमच्या डोक्यावरून हाथ फिरवणारी तुमची ही "ताईडी"
कधी ही अंतर पडू देणार नाही तुम्हाला.
कधी ही अंतर पडू देणार नाही तुम्हाला