STORYMIRROR

Priti Dabade

Fantasy Others

3  

Priti Dabade

Fantasy Others

नवरंग

नवरंग

1 min
208

पिवळा रंग म्हणजे

जणू सूर्यकिरणे कोवळी

निळा येता जोडीला

वाटे नभाची प्रकृती आगळी


लाल घेऊन येतो जिव्हाळा

हिरवा निसर्गाचा रंग

दोन्ही रंग पाहण्यात

मन होई दंग


पांढरा शांतता देणारा

प्रतिक सकारात्मकतेचे

लाल पांढऱ्याचे मिश्रण गुलाबी

लक्ष वेधी साऱ्यांचे


केशरी शौर्य दर्शवी

जांभळ्याचा थाट वेगळा

राखाडीची भर पडता

वाढे नवरंगाचा लळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy