STORYMIRROR

Manisha Patwardhan

Fantasy

3  

Manisha Patwardhan

Fantasy

कवी मन

कवी मन

1 min
262

माझ्यातील कवी मनाला

जपशील कां रे

गगनात अंगणी झुला

 बांधशील कां रे ....


सप्त रंगी इंद्रधनुचे

रंग देशील कां रे

तारकांची ती फुले 

वेचशील कां रे


चांदण्यांची मौतिक माला

आणशील कां रे

धरेच्या हिरवाईचे वस्त्र

 विणशील कां रे ...


स्वप्नीची सुवर्ण फूले

माळशील कां रे

सुंदर घरकुल अपुले

बांधशील कां रे ...


उंच आकाशी झेप घेण्या

 फिरवशील कां रे

नकाशातील जग सारे

दावशील कां रे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy